अशनूर कौरसारखे लग्नसोहळ्यावेळी सुंदर दिसण्यासाठी काळ्या रंगातील फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजला नेट फुल स्लीव्ह्ज लावून घेऊ शकता.
पांढऱ्या रंगातील लेहेंगा चोलीवर गुलाबी रंगातील फ्लोरल प्रिंट फार सुंदर दिसते. यावर तुम्ही हटके नेक असलेले ब्लाऊज परिधान करण्यासह नेटची ओढणी घ्या.
क्लासी लुकसाठी मल्टी कलर स्कर्ट विथ गोल्डन ब्लाऊज परिधान करू शकता. यावर कुंदन ज्वेलरी फार उठून दिसेल.
कॉकटेल अथवा संगीत पार्टीवेळी ग्लॅमरस लुक क्रिएट करण्यासाठी इंडो वेस्टर्न लेहेंगा परिधान करू शकता. यावर काळ्या रंगातील ब्रालेट ब्लाऊज परिधान करू शकता.
लग्नसोहळ्यासाठी स्टायलिश लुकसाठी इंडो वेस्टर्न लुकसाठी प्रिंसेस स्टाइल स्कर्ट अॅण्ड ब्लाऊज परिधान करू शकता. यावर ब्रालेट ब्लाऊज सुंदर दिसेल.
तरुणींना पेस्टल रंग फार सुंदर दिसतात. अशातच बहिणीच्या लग्नसोहळ्यात उठून दिसण्यासाठी पेस्टल रंगातील लेहंगा खरेदी करू शकता. यामुळे तुमचा लुक खुलला जाईल.
अकाशी रंगातील लेहेंगा बहिणीच्या लग्नसमारंभावेळी परिधान करू शकता. यावर फुलांची डिझाइन करण्यात आली आहे. याशिवाय लेहेंग्यावर नेट फ्रिल असणारी ओढणी दिली आहे.