मुलांच्या शाळेच्या डब्याला दररोज काय द्यायचे असा प्रश्न पडला असेल तर पुढील काही पौष्टिक असे पराठे देऊ शकता.
मेथीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. या रेसिपीसाठी मेथी बारीक चिरुन गव्हाच्या पीठात मिक्स करा.
फायबरयुक्त आणि पचनास हलका असा रताळ्याचा पराठा मुलांना डब्यात देऊ शकता. यासाठी रताळे, बटाटा, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट वापरु शकता.
पालक पराठासाठी पालक, बटाटा, कोथिंबीर, मिरची असे साहित्य वापरावे लागेल. या पराठ्यामुळे कॅल्शिअम आणि डोळ्यांचे आरोग्य राखले जाते.
प्रथिने आणि हाडं मजबूत होण्यासाठी मुलांना डब्यात पनीर पराठा देऊ शकता. यासाठी पनीर, लाल तिखट, चाट मसाला आणि गव्हाचे पीठ वापरा.
कोबी पराठ्याच्या माध्यमातून व्हिटॅमिन सी, के भरपूर प्रमाणात आरोग्याला मिळते. या रेसिपीसाठी कोबी, गव्हाचे पीठ, लाल तिखट वापरावे लागेल.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाजर पराठा मुलांना डब्यात देऊ शकता. यासाठी गाजर बारीक किसून गव्हाच्या पीठात मिक्स करुन पराठा तयार करा.
लोहयुक्त आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मुलांना डब्यात पौष्टिक असा बीटाचा पराठा देऊ शकता.
अँटीऑक्सिटेंड्सयुक्त ब्रोकोलीचा पराठा मुलांना डब्यात देऊ शकता. यासाठी ब्रोकोली उकडून त्यामध्ये लाल तिखट आणि गव्हाचे पीठ मिक्स करा.