कटिंग बोर्ड घसरू नये म्हणून त्याच्या खाली एक पेपर टॉवेल ठेवा. यामुळे काम करणं सोपं होईल.
लसूण सोलणं कठीण वाटतंय? एका बाऊलमध्ये लसूण टाकून जोरजोरात हलवा, सालं आपोआप आणि सहज निघतील.
चेरी आणि द्राक्षांसारख्या फळांच्या बिया काढण्यासाठी स्ट्रॉचा वापर करा. फळाच्या मध्यभागी स्ट्रॉ खुपसल्यास बी सहज बाहेर येते.
लिंबू आणि संत्र्यातून जास्त रस काढायचा आहे? त्यांना ५-७ सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा आणि मग रस पिळा.
काचेची भांडी नव्यासारखी चमकावीत असं वाटत असेल, तर धुण्यापूर्वी ती व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणात भिजत ठेवा.
चाकू आणि काट्याला लागलेला चिकटपणा दूर करण्यासाठी त्यावर लिंबाची साल घासा.
पनीर मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारं हवं असेल, तर ते उकळत्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा.
Kundan Jhumka : साडीवर शोभून दिसणारे कुंदन झुमके, पाहा भन्नाट डिझाईन्स
Glute Exercises : ग्लूट्सचे स्नायू मजबूत करणारे 7 सोपे व्यायाम
Amla Benefits : रोज एक आवळा खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, एकदा नक्की ट्राय करा
Iron Rich Foods : अॅनिमिया टाळायचाय? मग आहारात नक्की घ्या हे लोहयुक्त पदार्थ