हॉल्टर नेकमुळे स्टाइलिश लुक येतो. अशातच नॉट हॉल्टर नेक डिझाइन ब्लाऊज लेहंगा अथवा साडीवर परिधान करू शकता.
आजकाल क्रॉप टॉप स्टाइल ब्लाऊज परिधान करण्याचा ट्रेण्ड आहे. अशाप्रकारचे ब्लाऊज लेहंगा स्कर्ट अथवा जॉर्जेट साडीवर परिधान करू शकता.
सुटलेले पोट लपवण्यासाठी फ्रिल स्लिव्ह्ज ब्लाऊज परफेक्ट पर्याय आहे. अशाप्रकारचे ब्लाऊज मार्केटमध्ये 700 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
हटके आणि इंडो-वेस्टर्न लुकसाठी बेल्ट विथ अपर ब्लाऊज डिझाइन बेस्ट आहे. यावर बेल्टही पेअर करू शकता.
साडीत सुटलेले पोट लपवण्यासाठी फुल स्लिव्ह ब्लाऊज परिधान करू शकता. या ब्लाऊजच्या माध्यमातून इंडो-वेस्टर्न लुक क्रिएट करता येऊ शकतो.
सुटलेले पोट लपवण्यासाठी कॉर्सेट स्टाइलमध्ये वेगवेगळ्या डिझाइनचे अनेक ब्लाऊज तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येतील. अशाप्रकारचे ब्लाऊज बॉडी फिटेड असतात. यामुळे स्लिमही दिसाल.
बॅकलेस ब्लाऊज परिधान करणे बहुतांश महिलांना पसंत असते. दीपिका पादुकोणसारखा पांढऱ्या रंगातील हॉल्टर नेक ब्लाऊज पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट आहे.