आठवड्यातून एक किंवा दोन वेळा भुवयांना खोबरेल तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे भुवयांची वाढ वेगाने आणि दाट होते.
एका वाटीत एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. हे तेल भुवयांना लावून चांगला मसाज करा. यामुळे भुवयांचे आरोग्य सुधारते आणि केस गळणे थांबते.
भुवयांवर नियमितपणे कोरफड जेल लावणे केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते. हे जेल भुवयांना आवश्यक तो ओलावा आणि पोषण देते.
बोटांच्या टोकावर थोडेसे एरंडेल तेल घ्या आणि ते भुवयांवर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल.
एका कांद्याचा रस काढा आणि तो भुवयांना लावून ५ मिनिटे मसाज करा. हा उपाय नियमित केल्यास भुवया दाट आणि काळ्याभोर होतात.
अंड्याचा पांढरा भाग भुवयांच्या वाढीसाठी मदत करतो. एका कापसाच्या बोळ्याने हा पांढरा भाग भुवयांवर लावा आणि २० मिनिटे मसाज करा.
Kitchen Tips : स्वयंपाकाचं काम सोपं करण्यासाठी आईने सांगितलेल्या ७ सोप्या टिप्स
Kundan Jhumka : साडीवर शोभून दिसणारे कुंदन झुमके, पाहा भन्नाट डिझाईन्स
Glute Exercises : ग्लूट्सचे स्नायू मजबूत करणारे 7 सोपे व्यायाम
Amla Benefits : रोज एक आवळा खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, एकदा नक्की ट्राय करा