उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर आंब्यांचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये दिसून येतात. यामध्ये हापूस आंब्याला फार मागणी असते. अशात आंबा खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे पाहू.
प्रत्येक आंब्याचा रंग थोडाफार वेगळा असू शकतो. अशाच नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांचा रंग एकसमान असू शकत नाही.
आंबे रासायनिक प्रक्रिया करुन पिकवले असल्यास त्याची साल चमकत असल्याचे दिसेल. अथवा आंब्यावर पांढऱ्या रंगाच्या पावडरची लेअरही दिसेल. असे आंबे कॅल्शियम कार्बाइडच्या मदतीने पिकवतात.
नैसर्गित पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा वास सुमधूर असतो. तर रासायनिक प्रक्रिया करुन पिकवलेल्या आंब्यांना थोडा वेगळा वास येतो.
आंबा खरेदी करण्यापूर्वी एखादा कापून दाखवण्यास सांगा. जेणेकरुन आंबा आतमधून खराब नाही याची खात्री पटेल.
रासायनिक प्रक्रिया करुन पिकवलेल्या आंब्याचा आकार लहान असू शकतो. याशिवाय आंब्याचा रस सतत गळत असेल तर खरेदी करू नका.