मुलांची उंची वाढत नाही म्हणून काही पालक चिंतेत असतात. पण मुलांची उंची वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
मुलांची उंची न वाढण्यामागील कारण म्हणजे पोषण तत्त्वांची कमतरता असू शकते. यासाठी मुलांना डाएटमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी अशा पोषण तत्त्वांनी समृद्ध आहार द्यावा.
मुलांची उंची वाढण्यासाठी दीड चमचा नाचणी 3-4 तास भिजवून ठेवून बारीक वाटून घ्या. यामध्ये 1 चमचा सत्तू, वेलची, बदाम, अंजीर घालून पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घ्या.
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमसारखी पोषण तत्ते असतात. यामुळे हाडांना बळकटी मिळण्यासह स्नायूंची वाढ होण्यास मदत होते.
वेलचीमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. वेलीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारली जाते.
सत्तूमध्ये प्रोटीन, झिंक आणि लोहसारखी पोषण तत्त्वे असतात. यामुळे मुलांच्या वाढीसाठी मदत होते.
अंजीरमध्ये डाएटरी फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम गुणधर्म असतात. याच्या सेवनाने हाडांना बळकटी मिळते.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात. बदामाच्या सेवनाने स्नायूंचे कार्य उत्तम होण्यासह शरिराला उर्जा मिळण्यास मदत होते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.