आलिया भट्टसारखी प्लेन ब्लॅक सिल्क साडी पार्टी फंक्शनसाठी बेस्ट पर्याय आहे. यावर आलियाने कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊजने लूक पूर्ण केलाय.
सिंपल आणि सोबर लूकसाठी कुशा कपिलासारखी काळ्या रंगातील टिश्यू साडी नेसू शकता. यावर ब्लॅक रंगाचेच शिमर किंवा सिक्वीन वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करा.
गोल्डन आणि सिल्व्हर रंगात सिक्वीन बॉर्डर वर्क करण्यात आलेले काळी साडी फंक्शनसाठी बेस्ट आहे. अशाप्रकारची साडी 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
प्युअर सिल्क ब्लॅक साडी पार्टी फंक्शनसाठी नेसू शकता. यावर फुल हँड ब्लाऊज किंवा कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करुन पाहा.
प्लेन ब्लॅक नेट साडीवर जाळीदार पॅटर्न असणारे ब्लाऊज छान दिसेल. अभिनेत्रीचा हा लूक पार्टीवेळी रिक्रिएट करू शकता.
अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखी गोटापट्टी ब्लॅक साडी विथ जॅकेटचा लूक पार्टीवेळी रिक्रिएट करू शकता. या लूकमध्ये चारचौघांच्या नजरा नक्कीच तुमच्याकडे वळल्या जातील.