हिवाळ्यात खा या 5 चवदार चटण्या, आरोग्यही राहिल हेल्दी
Lifestyle Dec 19 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
थंडीतील चटण्या
बहुतांशजणांना जेवणात चटणीचे सेवन करणे आवडते. अशातच थंडीच्या दिवसात कोणत्या चटण्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते हे जाणून घेऊया...
Image credits: Social Media
Marathi
मेथीची चटणी
वजन कमी करणे ते केसांच्या वाढीसाठी मेथीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अशातच थंडीत मेथीच्या चटणीचे सेवन केल्यास शरीर आतमधून उष्ण राहण्यास मदत होईल.
Image credits: Social media
Marathi
आवळ्याची चटणी
हिवाळ्यात आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आवळ्याच्या चटणीच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटफुगीची समस्या दूर राहते.
Image credits: social media
Marathi
पुदीना-कोथिंबीर चटणी
पुदीना-कोथिंबीरच्या चटणीचे सेवन जेवणात केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय मळमळ-उलटीची समस्या उद्भवल्यास पुदीना-कोथिंबीरची चटणी करू शकता.
Image credits: social media
Marathi
मुळ्याची चटणी
मुळ्याच्या सेवनाने भरपूर प्रमाणात शरिराला व्हिटॅमिन सी, ए, लोह आणि कॅल्शियम मिळते. थंडीत मुळ्याची चटणी जेवणासोबत खाऊ शकता.
Image credits: social media
Marathi
बीटाची चटणी
बीटाचे सेवन केल्याने रक्तातील हिमग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. बीटाची चटणी तयार केल्यानंतर त्यावरुन हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता.