वाढत्या गरम्यामुळे अंगाची लाही लाही होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असते. खासकरून लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
लहान मुलांना उन्हाळ्याच्या दिवसात हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे मुलांच्या डाएटमध्ये पुढील काही फळांचा नक्कीच समावेश करा.
उन्हाळ्याच्या दिवसात मुलांमध्ये डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू नये म्हणून त्यांना कलिंगड खायला द्या. यामध्ये भरपूर प्रमाण पोषण तत्त्वे असतात.
अननसामध्ये 80 टक्के पाण्याचे प्रमाण असते. याशिवाय अननस व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानला जातो. याचा ज्यूस तुम्ही मुलांना उन्हाळ्याच्या दिवसात प्यायला देऊ शकता.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाते.
पेर फळात फायबर, व्हिटॅमिनसह अन्य काही गुणधर्म असतात. याचा आरोग्याला फार मोठा फायदा होतो. मुलांना तुम्ही पेर फळ उन्हाळ्याच्या दिवसात खायला देऊ शकता.
मुलांना जांभूळ खायला आवडत नसल्यास त्याचा ज्यूस प्यायला देऊ शकता. यामुळे मुलांच्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल.