साखर कमी असलेले आणि फायबरयुक्त अन्न खा. गहू, बाजरी, ओट्स, डाळी, पालेभाज्या, आणि सुकामेवा योग्य प्रमाणात घेणं महत्त्वाचं आहे. पांढऱ्या तांदळाचा भात, साखर, गोड पदार्थ खाणे टाळा.
दररोज किमान 30 मिनिटं चालणं, सायकलिंग, योगा किंवा हलकंफुलकं स्ट्रेचिंग केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शरीर सक्रिय राहिलं की इन्सुलिनचा प्रभावही वाढतो.
रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासल्यास नियंत्रण ठेवणं सोपं जातं. डॉक्टरांनी सुचवलेल्या वेळापत्रकानुसार तपासण्या करून घ्या.
तणावामुळे शरीरात साखरेचं प्रमाण वाढू शकतं. ध्यान, प्राणायाम, छंद जोपासणं आणि सातत्यानं ७–८ तासांची झोप यामुळे मानसिक शांतता मिळते आणि मधुमेह नियंत्रित राहतो.
डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या किंवा इन्सुलिन वेळेवर घ्या. स्वतः औषधं थांबवू नका. दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी आणि डॉक्टरांशी सल्ला अवश्य घ्या.