मागील काही दिवसांपासून अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला अंबानी यांची संपत्ती कमी झाली आहे.
अदानी यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ६३६० कोटी डॉलर पर्यंत पोहचली आहे.
गौतम अदानी हे जगातील १८ वे सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. त्यांचा भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो.
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात सर्वात श्रीमंत कोण याची कायमच चुरस सुरु असते. अदानी आणि अंबानी यांच्यात मुकेश अंबानी हे पुढं आहेत.
गौतम अदानी हे हिंडेनबर्ग अहवालामुळे सर्वात आधी वादात सापडले होते. नंतर अमेरिकेत त्यांच्या नावाने वॉरंट काढण्यात आलं होत.