नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे कुटुंब अनेक लोकांसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या कुटुंबातील अक्षता मूर्ती, ऋषी सुनक, रोहन मूर्ती हे आप आपल्या क्षेत्रात काम करून समाजासाठी आदर्श आहे
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग म्हैसूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आयआयटी कानपुरमधून मास्टर्स डिग्री घेतली आहे.
नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी बिवीबी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे.
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केलेलं आहे.
रोहन मूर्ती यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर हावर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे.
रोहन मूर्ती यांच्या पत्नी अपर्णा कृष्णन यांनी इकॉनॉमिक्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी डार्टमाऊथ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे अक्षता मूर्ती यांचे पती आहेत. त्यांनी स्टॅनफर्ड आणि ऑक्सफोर्ड येथून शिक्षण पूर्ण केले आहे.