अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल यांच्या मुलाचे नाव पुलकित केजरीवाल आहे. हर्षिता केजरीवाल असे मुलीचे नाव आहे. अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबातील हि तिसरी पिढी इंजिनिअर आहे.
अरविंद केजरीवाल हे स्वतः अभियंता राहिले आहेत. वडील गोविंद राम केजरीवाल हे देखील अभियंता आहेत. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले.
अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित केजरीवाल आणि मुलगी हर्षिता यांनीही वडिलांप्रमाणेच इंजिनिअरिंग केले आहे. दोघेही आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी आहेत.
पुलकित केजरीवालला 12 वीत 96.4 टक्के गुण मिळाले होते. पुलकित सध्या त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे. मात्र, वडिलांप्रमाणेच त्यांना राजकारणात रस आहे
केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिला 12वीत 96 टक्के गुण मिळाले होते. आयआयटी दिल्लीतून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर हर्षिता एकामल्टी नॅशनल कंपनीत काम करत आहे.
गरिबांसाठी काही मागण्या पुलकितने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केल्या नंतर ते चर्चेत आले होते.
अरविंद केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि नंतर आयआरएस अधिकारी आणि नंतर दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. पत्नी सुनीता या माजी IRS अधिकारी होत्या.