अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केली आहे. केजरीवाल हे 1 जून 2024 पर्यंत तुरुंगाच्या बाहेर राहणार आहेत.
अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करतील. त्यामुळे त्यांच्या पार्टीचे जास्तीत जास्त सीट निवडून यायला मदत होईल.
अरविंद केजरीवाल हे दिल्ली, पंजाब आणि हरियाना येथील उमेदवारांसाठी प्रचार सभा आणि रोड शो घेतील. त्यामुळे मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो.
आपचे नेते सौरभ भारद्वाज यांना विचारले असता त्यांनी पक्षाची रणनीती बदलण्यात येईल असे सांगितले होते.
अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने 2 जून रोजी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत.