सोने हे नॉन रिइक्टिव्ह आणि नॉन मॅग्नेटिक धातू आहे. सोने हे चुंबकाकडे आकर्षित होत असेल तर सोने नाही किंवा ते शुद्ध नाही.
आपण सोने खरे आहे का हे तपासण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करू शकता. एका मोठ्या दगडावर सोने घासून त्यावर हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड मिसळा.
शुद्ध सोने हे पाण्यामध्ये तरंगत नाही. त्यामुळे एखाद्या वेळी आपण घेतलेलं सोनं हे पाण्यात तरंगत असेल तर ते अशुद्ध आहे असं समजून घ्यावे.
आपण सोने शुद्ध आहे की खोटे याचा तपास हा हॉलमार्कवरून लावू शकतो. शुद्ध सोन्यावर हॉलमार्कचा सिम्बॉल लावलेला असतो.