Marathi

उबर शिकारा: दल सरोवरावर आशियातील पहिली जल परिवहन सेवा सुरू

Marathi

आशियातील पहिली जल परिवहन सेवा आहे उबर शिकारा

आशियातील पहिली जल परिवहन सेवा उबर शिकारा आता जम्मू-काश्मिरच्या सुंदर दल सरोवरात उपलब्ध आहे. उबरने आपल्या अ‍ॅपवर शिकारा बुकींगची सेवा सुरू केली आहे. जाणुन घ्या याची विशेषता

Image credits: X
Marathi

दल सरोवरात सुरू केली गेली सेवा

दल सरोवरात येणारे पर्यटक आता उबरच्या पहिल्या जल परिवहन सेवा 'उबर शिकारा'च्या लॉन्चमुळे परेशानी मुक्त प्रवासाचा अनुभव घेतील.

Image credits: X
Marathi

काय आहे सेवेचा उद्देश

या नाविन्यपुर्ण उपक्रमाचा उद्देश परंपरेशी तंत्रज्ञानाची जोड देणे हा आहे. ज्यामुळे प्रवाशांना लोकप्रिय राईड-हेलिंग अ‍ॅपद्वारे शिकारा राईड्स आगाऊ बुक करता येईल.

Image credits: X
Marathi

कोणी केली सुरुवात?

ही सेवा उबेर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग यांनी सुरू केली. त्यांनी ॲपद्वारे पहिली शिकारा राइड बुक केली.

Image credits: X
Marathi

इटलीसारख्या निवडक देशांमध्ये उपलब्ध आहेत अशा सेवा

ते म्हणाले की उबेर शिकारा कंपनीसाठी मैलाचा दगड आहे, कारण इटली (व्हेनिस)सारख्या निवडक युरोपियन देशांमधील सेवांनंतर आशियातील ही पहिली जलवाहतूक सेवा आहे

Image credits: X
Marathi

7 स्थानिक शिकारा मालकांसह भागीदारी

Uber ने 7 स्थानिक शिकारा मालकांसोबत भागीदारी केली व वापरकर्त्याच्या मागणीच्या आधारावर विस्तार करेल. वाजवी किंमत सुनिश्चितीसाठी सरकारच्या नियमन केलेल्या दरावर राइड्स उपलब्ध असतील

Image credits: X
Marathi

उबर भागीदारांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही

दल सरोवराच्या मध्यभागी असलेल्या नेहरू पार्कमध्ये 7 शिकारे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे उबेर भागीदारांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही,  ज्यामुळे संपूर्ण भाडे बोट चालकांना दिले जाईल.

Image credits: X
Marathi

श्रीनगरला भेट देणाऱ्यांना उबेरचा वेगळाच अनुभव मिळेल

उबेरच्या संप्रेषण संचालक रुचिका तोमर यांनी सांगितले की, श्रीनगरला भेट देणाऱ्या प्रत्येकाने शिकारा राईडचा अनुभव घेतला पाहिजे.

Image credits: X
Marathi

बुकिंगची वेळ काय आहे?

प्रत्येक उबेर शिकारा राईडमध्ये जास्तीत जास्त ४ लोक बसू शकतात. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत १ तास बुकिंगसाठी उपलब्ध आहे. १२ तास ते १५ दिवस अगोदर राइड्स बुक करता येतात.

Image credits: X
Marathi

बोट राईडसारखे दिसते

उबरने यापूर्वी कॅब सेवांसह श्रीनगरमध्ये अस्तित्व प्रस्थापित केले आहे. उबर शिकारा लाँच करण्यामागे पर्यटकांना दल सरोवरात बोटीतून प्रवासाचा आनंद लुटण्याचा मार्ग बदलण्याचा उद्देश आहे.

Image credits: X

किती ताकदवान आहे भारतीय नौदल? जाणून घ्या जगातील स्थान

शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच, 5 हजार जवान तैनात

३ मुले जन्माला घालावीत, सरसंघचालकांचे आवाहन का?

कोण आहेत अवध ओझा ज्यांनी धरला केजरीवाल यांचा हात, किती आहे संपत्ती?