जगातील सर्वात ताकदवान १० नौदलांमध्ये भारतीय नौदलाचे स्थान सातवे आहे. भारतीय नौदलाची स्थापना १६१२ मध्ये झाली होती. तेव्हा याला 'रॉयल इंडियन नेव्ही' म्हटले जात होते.
भारतीय नौदलाचे सुप्रीम कमांडर हे भारताचे राष्ट्रपती असतात
१६१२ मध्ये भारतीय नौदलाची स्थापना झाली होती. भारतीय नौदल आता एक आधुनिक आणि शक्तिशाली सेना बनले आहे.
अणुयद्ध रोखणे, सागरी संरक्षण आणि युध्दा दरम्यान समुद्री आघाडी संभाळणे हे नौदलाचे मुख्य काम आहे.
भारतीय नौदलाकडे INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत हे दोन शक्तिशाली एअक्राफ्ट कॅरिअर आहेत.
भारतीय नौसेनाचे बेस भारताच्या वेगवेगळ्या भागात आहेत. अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडु, केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात येथे हे बेस आहेत.
भारतीय नौदलाचे हे बेस एम्यूनिशन सपोर्ट, लॉजिस्टिक आणि एअर ऑपरेशन सारख्या अनेक कामांसाठी सहाय्यक आहेत
नौदलाकडे
* ८ टँक लँडिंग जहाज
*१२ विध्वंसक आणि १२ फ्रिगेट
*१६ सबमरीन आणि २२ कार्वेट
*१० मोठे ऑफशोअर पेट्रोलिंग शिप
२ न्युक्लिअर बॅलेस्टिक मिसाईल सबरीन बरोबर भारतीय नौदल सागरी सुक्षेत पुढे आहे. मिसाईल बोट बेस आणि सबमरीन युनिट्स नौदलाची ताकद वाढवतात.
नौदलाकडे ५ फ्लीट टँकर, छोट्या पेट्रालिंग बोट आणि सहाय्यक जहाज आहेत. यामुळे समुद्रातील प्रत्येक आव्हानाचा सामना केला जावू शकतो.
भारतीय नौदल देशाच्या सीमेच्या संरक्षणा बरोबरच नैसर्गिक संकटामध्ये देखील मदत करते.