४ जूनचा लोकसभा निकाल पाहून शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले आहे. सेन्सेक्समध्ये २२०० अंकांची घसरण झाली असून निफ्टी ६१७ ने खाली पडला आहे.
शेअर मार्केटमध्ये NDA च्या ४०० जागांच्या दाव्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सेन्सेक्समध्ये ३० मधील २८ शेअर्स हे पडले असून २ शेअरमध्येच वाढ झाली आहे. सनफार्मा आणि नेस्ले या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये थोडी वाढ झाली आहे.
एक्झिट पोलनुसार शेअर बाजार सोमवारी सर्वात जास्त आघाडीवर होता. त्यामुळे हीच आघाडी मतमोजणीच्या दिवशी राहील का, हा अंदाज मात्र खोटा ठरताना दिसत आहे.
शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार कंगाल झाले आहेत. त्यांनी केलेली गुंतवणुकीला हा फटका बसला आहे.