मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. भारतासाठी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून तिची नियुक्ती झाली आहे.
India Aug 13 2026
Author: Karishma R Image Credits:instagram- yogenshah_s
Marathi
भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा उद्देश
साराच्या माध्यमातून जास्तीत जास्त भारतीय पर्यटकांना ऑस्ट्रेलियाकडे आकर्षित करणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Image credits: own insta
Marathi
दोन वर्षांसाठी केला करार
सारा तेंडुलकर पुढील दोन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियन टूरिझमची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम पाहणार आहे.
Image credits: own insta
Marathi
मॉडेलिंगमध्ये आहे सक्रिय
सारा तेंडुलकरने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे. ती मॉडेलिंग आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनही काम करते.
Image credits: own insta
Marathi
किती मानधन घेणार सारा?
सारा ऑस्ट्रेलियाच्या टीव्ही जाहिरातींमध्येही दिसणार आहे. पण या कामासाठी तिला किती मानधन मिळणार आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
Image credits: own insta
Marathi
130 मिलियन डॉलरची योजना
ऑस्ट्रेलियन सरकारने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 130 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 1140 कोटी रुपयांची एक मोठी योजना तयार केली आहे.
Image credits: own insta
Marathi
भारतासह इतर देशांवरही लक्ष
या मोहिमेअंतर्गत चीन, भारत, अमेरिका, ब्रिटन आणि जपान यांसारख्या देशांतील लोकांना ऑस्ट्रेलियात आणण्याचं लक्ष्य आहे. या प्रचार कार्यक्रमाची सुरुवात चीनमधून होणार आहे.
Image credits: insta/saratendulkar_ig
Marathi
अनेक दिग्गजही मोहिमेचा भाग
सारासोबत ऑस्ट्रेलियाचे वन्यजीव संरक्षण तज्ज्ञ रॉबर्ट इर्विन, अभिनेता योश यू आणि ब्रिटनची प्रसिद्ध फूड ब्लॉगर निगेला लॉसन हेदेखील या मोहिमेचा भाग आहेत.