Top 10 IITs in India: केंद्र सरकारने NIRF रँकिंगनुसार भारतातील सर्वोत्तम IITs ची यादी जाहीर केली आहे. IIT मद्रासने अव्वल स्थान पटकावले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) च्या यादीत IIT मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईमधील या संस्थेने 89.46 गुण मिळवले आहेत.
IIT दिल्लीने 86.66 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. तर मुंबईतील IIT बॉम्बे 83.09 गुणांसह देशातील तिसरी सर्वोत्तम तांत्रिक शिक्षण संस्था ठरली आहे.
IIT कानपूर 82.79 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालमधील IIT खरगपूरने 76.88 गुण मिळवून पाचवे स्थान पटकावले आहे.
उत्तराखंडमधील IIT रुरकी 76.00 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर आसाममधील IIT गुवाहाटीने 71.86 गुणांसह सातवे स्थान मिळवले आहे.
तेलंगणामधील IIT हैदराबाद 71.55 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. दक्षिण भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांपैकी ही एक आहे.
वाराणसीमधील IIT (BHU) 66.69 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर IIT धनबादने 64.83 गुणांसह टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.
डीप फ्रिजचं किती असतं तापमान, माहित झाल्यावर जाल हादरून
Sara Tendulkar: बांधणी साडीत साराचा जलवा, अदांनी केलं चाहत्यांना घायाळ
हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील
Independence Day 2025: ऐकायला हवी अशी अद्वितीय देशभक्तीपर गाणी