मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांनी जीवनभर कम्युनिस्ट चळवळीची सेवा केली. जाणून घेऊयात त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाविषयी.
12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास (चेन्नई) येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात जन्म. प्रेसिडेंट इस्टेट स्कूल, नवी दिल्ली आणि नंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथे शिक्षण घेतले.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे तीन वेळा अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरील विधान वाचून प्रसिद्धी मिळाली.
CPI(M) पक्षाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1996 मध्ये संयुक्त आघाडी सरकारसाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार केली. 2004 मध्ये यूपीए सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका.
अनेक दिवसांपासून आजारी होते. 19 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल. तीव्र श्वसनमार्गाच्या संसर्गासाठी उपचार घेतले.
आज दुपारी एम्स, दिल्ली येथे त्यांचे निधन. ते 72 वर्षांचे होते. राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.
कम्युनिस्ट चळवळीतील त्यांचे समर्पण आणि भारतीय राजकारणातील त्यांच्या योगदानाबद्दल कायम ते स्मरणात राहतील. त्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.