Marathi

Independence Day 2025: ऐकायला हवी अशी अद्वितीय देशभक्तीपर गाणी

Marathi

१५ ऑगस्टच्या सेलिब्रेशनला देशभक्तीचा रंग देणारी गाणी

स्वातंत्र्य दिन हा फक्त झेंडा वंदनाचा दिवस नाही, तर देशभक्तीच्या भावनेत वाहून नेण्याचा दिवस असतो. अशा वेळी बॉलिवूडची देशभक्तीपर गाणी प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्श करतात.

Image credits: Getty
Marathi

ए मेरे वतन के लोगो – लता मंगेशकर

१९६३ साली लता मंगेशकर यांनी पंडित नेहरूंच्या उपस्थितीत गायलेलं हे गीत आजही हृदय पिळवटून टाकतं. देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना आदरांजली वाहणारं हे गाण ऐकताना डोळ्यात अश्रू येतात

Image credits: Getty
Marathi

माँ तुझे सलाम – ए. आर. रहमान

‘वंदे मातरम’च्या या आधुनिक आवृत्तीने भारतीय तरुणाईला एक नवा जोश दिला. ए. आर. रहमान यांच्या दमदार आवाजातलं हे गाणं मातृभूमीबद्दलची ओढ आणि अभिमान व्यक्त करतं.

Image credits: Freepik
Marathi

संदेसे आते हैं – बॉर्डर

१९९७ मधील बॉर्डर चित्रपटातील हे गीत सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या भावनांना जिवंत करतं. घरच्यांच्या पत्रांच्या प्रतीक्षेत सैनिक आणि देशसेवेचं कर्तव्य यातला संघर्ष दाखवला आहे.

Image credits: Getty
Marathi

तेरी मिट्टी – केसरी

२०१९ च्या केसरी चित्रपटातील हे गीत मातृभूमीसाठी बलिदान देण्याच्या भावनेने भारलेलं आहे. “तेरी मिट्टी में मिल जावां” ही ओळच मनात देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा जागवते.

Image credits: Getty
Marathi

जय हो – स्लमडॉग मिलेनियर

ए. आर. रहमान यांच्या संगीताने सजलेलं हे ऑस्कर विजेतं गीत एकता, विजय आणि उत्साहाचं प्रतीक आहे. देशभक्तीच्या कार्यक्रमांमध्ये यामुळे प्रेक्षकांमध्ये जोश आणि उर्जा संचारते.

Image credits: social media
Marathi

कर चले हम फिदा – हकिकत

१९६४ च्या हकिकत चित्रपटातील हे गाणं युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं आहे. देशासाठी सर्वस्व देणाऱ्या सैनिकांच्या मनोवृत्तीचं ते वास्तव दर्शन घडवतं.

Image credits: social media

Pune to Leh Ladakh: पुण्यावरून लेह लडाखला कसा पोहचता येईल?

श्रावणात सोमवारी उपवास का करतात, कारण जाणून घ्या

Shubhanshu Shukla Wife Kamna Shukla Education : शुभांशु शुक्ला यांची पत्नी किती शिकलेली?, काय काम करतात?

Indian Magical Villages : भारतातील या अविस्मरणीय गावांना भेट दिली नाही तर तुम्ही काय बघितले!