अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आपमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली वाढल्या आहेत. पंजबामधून पक्षाचे एकमेव खासदार सुशील कुमार टिंकू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
India Apr 13 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आप खासदारांचे मौन
आपच्या सात खासदारांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी लावलेले अंदाज वेगळेच आहेत. दहा राज्यसभा खासदार असणारा आम आदमी पक्ष आहे.
Image credits: social media
Marathi
राघव चड्डा कुठे आहेत?
राघव चड्डा हे आम आदमी पक्षातील प्रमुख नेते असून ते गायब आहेत. लंडनवरून डोळ्यांची सर्जरी करून ते मार्चमध्ये येणार होते पण अजूनही आलेले नाहीत.
Image credits: Parineeti Chopra instagram
Marathi
स्वाती मालिवाल गायब आहेत
दिल्लीमधून पहिल्यांदाच खासदार झालेल्या स्वाती मालिवाल या पक्षाच्या प्रमुख चेहरा आहेत. त्या अमेरिकेत बहिणीचे उपचार करत असून फक्त सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
Image credits: social media
Marathi
हरभजन सिंग शांत आहे
पंजाब मधून आपचा हरभजन सिंग खासदार असून तो शांत आहे. हरभजन विरोधात प्रदर्शन करण्याला कायम विरोध करत असतो.