सर्वात कमी वयात राम मोहन नायडू यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. त्यांना नागरिक उड्डाण मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्या आधी ज्योतिराधित्य अदित्य हे या खात्याचे मंत्री होते.
राम मोहन नायडू हे येरन नायडू यांचे चिरंजीव आहेत. ते टीडीपी या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत.
राम मोहन नायडू लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये तिसऱ्या वेळी खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी समोरच्या उमेदवाराचा ३,२७,९०१ मतांनी पराभव केला होता.
राम मोहन नायडू २०१४ मध्ये पहिल्या वेळी लढून जिंकले होते. ते सर्वात कमी वयात खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते २०१९ मध्ये निवडून आले होते.
राम मोहन नायडू दिल्ली पब्लिक स्कुलमधून शिक्षण झाले आहे. त्यांनी यानंतर अमेरिका येथून शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आहे.
राम मोहन यांनी २०११ मध्ये त्यांनी एमबीए डिग्री मिळवली आहे. त्यांनी सिंगापूरमध्ये सुरुवातीला करिअर बनवले होते.