केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ग्वाल्हेर राजघराण्यातील माधवी राजे कालवश . त्या नेपाळच्या राजघराण्याच्या कन्या होत्या. माधव राव सिंधिया यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या ग्वाल्हेरच्या राजमाता बनल्या.
माधवी राजे यांचे लग्नापूर्वीचे नाव किरण राज लक्ष्मी होते. सिंधिया राजघराण्याची सून झाल्यानंतर माधवी नाव ठेवण्यात आले. राजघराण्यातील असूनही साधी जीवनशैली होती.
माधवी राजे यांचे पती म्हणजेच ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव सिंधिया केंद्रीय मंत्री राहिले आहेत. राजमाता यांचे वडील जूद्ध शमशेर जंग बहादूर राणा नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत.
माधवी राजे आणि माधव राज सिंधिया यांचा विवाह ८ मे १९६६ रोजी झाला होता. माधव राव त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीला ग्वाल्हेरहून दिल्लीला ट्रेनने गेले तेव्हा हे लग्न चर्चेत आले होते.
माधवी राजे सिंधिया यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून नाजूक होती. ती काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होती. मुलगा ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक प्रचार सोडून आईजवळ पोहोचला.