भंगारापासून अप्रतिम तीर्थक्षेत्र बनवता येते असे तुम्ही कधी ऐकले आहे का? यूपीच्या संगम शहर प्रयागराजमधील महाकुंभनगर भागातील शिवालय पार्क याचा जिवंत पुरावा ठरला आहे.
प्रयागराजमध्ये बनवलेले हे उद्यान ४०० टन भंगारापासून तयार करण्यात आले आहे, ज्यात गंजलेले विद्युत खांब, जुने ट्रक, कार, पाईप, रिक्षा व तुटलेल्या रेल्वे ट्रॅकचा वापर करण्यात आला आहे.
हे उद्यान तयार झाले असून जिकडे तिकडे गर्दी दिसुन येत आहे. या उद्यानाला भेट देण्यासाठी निश्चित शुल्क आहे. ३० ते १०० रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागते.
भारताच्या नकाशाच्या आकारात बांधलेल्या शिवालय पार्कमध्ये देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या वास्तविक स्थानांनुसार प्रतिकृती आहेत. तीर्थयात्रेचा अनुभव मिळावा हा त्याचा उद्देश आहे.
या मंदिरांमध्ये १२ ज्योतिर्लिंगे तसेच भारत आणि नेपाळमधील इतर प्रमुख शिवालय समाविष्ट आहेत. उद्यानात दररोज ५० हजार पर्यटक येऊ शकतात.
उद्यानात तुळशी वन व संजीवनी वनही तयार करण्यात आले आहे. मुलांसाठी स्वतंत्र झोन आहे. शिवाय उद्यानात फूड कोर्ट व रेस्टॉरंटही आहे. वेस्ट एंड वंडर थीमवर हे उद्यान तयार करण्यात आले आहे.
या उद्यानाची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. १४ कोटी रुपये खर्चून ११ एकरात पसरलेले हे उद्यान तयार करण्यासाठी २२ कलाकार आणि ५०० कामगारांना तीन महिन्यांचा कालावधी लागला.
वेस्ट एंड वंडर थीमवर हे उद्यान तयार करण्यात आले आहे. हे केवळ पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन देत नाही तर कलेद्वारे भंगाराचा पुनर्वापर देखील करते.
उद्यानात दररोज ५० हजारहून अधिक पर्यटकांना सामावून घेता येईल. लहान मुलांसाठी स्वतंत्र झोन, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, ६०० मीटर लांब जलाशय, ७०० चौरस मीटर लांब पार्किंग अशा सुविधा आहेत.