उर्मिला कोठारे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यांच्या गाडीने दोन मजुरांना उडवले असून त्यातील एक जणाचा मृत्यू झाला आहे.
अपघातात उर्मिला कोठारे यांना किरकोळ जखम झाली आहे. यावेळी एअरबॅग उघडल्यामुळे त्यांचा ड्रायव्हर आणि उर्मिला स्वतः सुरक्षित राहिल्या.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारे यांची ओळख आहे. शुभमंगल सावधान आणि दुनियादारी अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
उर्मिला कोठारे यांचे खरे नाव उर्मिला कानेटकर असं आहे. त्यांचे महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांच्यासोबत लग्न झालं.
उर्मिला यांनी आदिनाथ कोठारे यांच्यासोबत शुभमंगल सावधान चित्रपटाच्यावेळी सूर जुळून आले. दोघांचे २०११ मध्ये लग्न झालं असून त्यांना जिजा नावाची एक मुलगी आहे.
उर्मिला कोठारे या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांना १ मिलियन फॉलोवर्स असून येथे त्या कायम अपडेट देत असतात.