सलमान खान 27 डिसेंबरला आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच सेलिब्रेशनचे काही खास फोटो समोर आले आहेत.
सलमानच्या वाढदिवस सेलिब्रेशनसाठी खास मैत्रीण यूलिया वंतूर आली होती. तिने सेलिब्रेशनचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद केलेत.
सलमानने भाची आयतसोबत वाढदिवसाचा केक कापला. यावेळी सर्वजण सेलिब्रेशनचा आनंद घेताना दिसले.
संगीत दिग्दर्शक साजिद खानने इंस्टाग्रामवर सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सलमान खानने बॉडीगार्ड शेरासोबत खास फोटो काढला आहे.
सलमान खानने पार्टीमध्ये आलेल्या मित्रपरिवारासोबत फोटो काढले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सलमान खानने वाढदिवसावेळी स्किन कलरचे जॅकेट, ब्लॅक टी-शर्ट आणि निळ्या रंगातील जीन्स घातली होती.