अल्लू अर्जुनचा तेलुगु चित्रपट 'पुष्पा २: द रुल' बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने २२ दिवसांत जगभरात 1585.50 कोटी रुपये कमावले आहेत.
'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरपासून सातत्याने जबरदस्त कमाई करत आहे. यापुढे दुसरा कोणताही चित्रपट टिकू शकला नाही. पण आता एक असा चित्रपट आला आहे जो 'पुष्पा 2' वर भारी पडला आहे.
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे 'मुफासा: द लाइन किंग'. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन यांनी आवाज दिला आहे.
'मुफासा: द लाइन किंग'ने अवघ्या ७ दिवसांत कमाईच्या बाबतीत 'पुष्पा 2'ला मागे टाकले आहे. या चित्रपटाचे आतापर्यंतचे जागतिक कलेक्शन 1692.34 कोटी रुपये झाले आहे.
'मुफासा: द लाइन किंग' हा बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित अमेरिकन चित्रपट आहे. वॉल्ट डिस्ने पिक्चर्स ही या चित्रपटाची निर्मिती कंपनी आहे.
रिपोर्ट्सनुसार, 'मुफासा: द लाइन किंग' ची निर्मिती अंदाजे 200 दशलक्ष डॉलर्स किंवा भारतीय रुपयात 1711.7 कोटी रुपये आहे