बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची सनातन हिंदू एकता यात्रा संपन्न झाली आहे. त्यांचे गुरू जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी धीरेंद्र शास्त्री यांची लग्नाविषयी चर्चा केली
जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी सांगितले की मी जेथे जातो तेथे पत्रकार मला शिष्य धीरेंद्र शास्त्री यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारतात.आता मी याविषयी स्पष्टीकरण देतो.
रामभद्राचार्य यांनी आधी सांगितले की ते स्वत: धीरेंद्र यांचे लग्न करावे की नाही याविषयी कन्फ्युज आहेत.
रामभद्राचार्य यांनी सांगितले की चिंता करू नका धीरेंद्र शास्त्री यांचे लवकरच लग्न होईल. ते स्वत: लवकरच त्यांचे हात पिवळे करतील.
इतकेच नाही तर रामभद्राचार्य म्हणाले की ते स्वत: धीरेंद्र शास्त्रींसाठी मुलगी फायनल करतील.
धीरेंद्र शास्त्री आपल्या सनातन हिंदू एकता पदयात्रा समाप्तीनंतर आज इंदौर येथे पोहचले आहेत. येथील लालबाग परिसरात हनुमान चालीसाचे पठन करतील. एक लाख त्यांना ऐकण्यासाठी येणार आहेत.