बालपणासूनच अभिनयाचे धडे, आपल्याच चाहत्याशी लग्न, कोण आहे हा अभिनेता?
Entertainment Jun 22 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
थलापति विजयचा वाढदिवस
22 जूनला चेन्नईत थलापति विजयचा जन्म झाला होता. अभिनेता आज आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे.
Image credits: instagram
Marathi
वयाच्या 10 व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात
थलापति विजयने वयाच्या 10 व्या वर्षापासून अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. याशिवाय चाइल्ड आर्टिस्ट म्हणूनही काही सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
Image credits: instagram
Marathi
सिनेमांसाठी आई-वडिलांकडून नकार
थलापति विजयचे वडिल त्याच्या सिनेसृष्टीतील करियरसाठी विरोधात होते. यामुळेच थलापति विजयला आपल्याच आई-वडिलांशी खोट बोलावे लागले.
Image credits: instagram
Marathi
18 व्या वर्षी मुख्य कलाकाराची भूमिका
वर्ष 1974 मध्ये थलापति विजयने सिनेमात मुख्य कलाकाराची भूमिका साकारत वयाच्या 18 व्या वर्षी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. ‘नालया थीरपू’ सिनेमातून डेब्यू केला होता.
Image credits: instagram
Marathi
बॉलिवूडमध्येही काम
विजयने साउथ सिनेमांसह बॉलिवूडमध्येही काम केले. विजयने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत काम केले आहे. याशिवाय प्रियांका चोप्राच्या साउथ डेब्यू सिनेमातही विजय झळकला आहे.
Image credits: Social Media
Marathi
सिनेमासाठी फी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय एका सिनेमासाठी 65-100 कोटी रुपये फी घेतो. अभिनेत्याचे नेटवर्थ 420 कोटी रुपये आहे. याशिवाय विजयने आजवर 64 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.
Image credits: Social Media
Marathi
थलापति विजयची लव्ह स्टोरी
वर्ष 1996 मध्ये विजय चेन्नईत एका सिनेमाचे शूटिंग करत होता. यावेळी एका चाहत्याने ऑटोग्राफ मागितली असता ती व्यक्ती त्याची पत्नी संगीता होती. पहिल्याच भेटीत विजय तिच्या प्रेमात पडला.
Image credits: social media
Marathi
आगामी सिनेमा
थलापतिच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास तो 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' मध्ये झळकणार आहे.