साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २' ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट 'पुष्पा २' ५ डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होत आहे. हा चित्रपट १२ हजार स्क्रिनवर रिलीज होणार आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा २' ५०० कोटीच्या बजेटमध्ये बनवला आहे. चित्रपटाने रिलीजच्या आधीच १००० कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत
'पुष्पा २' च्या रिलीज पुर्वीच्या पाच चित्रपटांविषयी माहिती घेऊया. तथापि, त्याच्या यापैकी कोणत्याही चित्रपटाला ४०० कोटीचा आकडा गाठता आला नाही.
२०२१ मध्ये आलेला ‘पुष्पा द राईज’ सुपरहिट ठरला होता. २०० कोटी बजेटच्या या चित्रपटाने ३६५ कोटींचे कलेक्शन केले होते.
अल्लु अर्जुनचा चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो' २०२० मध्ये आला होता. ८५ कोटी बजेट असणाऱ्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने २६० कोटींचा व्यवसाय केला होता.
२०१६ मध्ये आलेला अल्लु अर्जुनचा चित्रपट 'सराइनोडु'ने १२६ कोटींचे कलेक्शन केले होते. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
२०१७ मध्ये आलेला चित्रपट 'दुवदा जगन्नाधम' देखील हिट राहिला होता. ७५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ११९ कोटींचा व्यवसाय केला होता.
अल्लु अर्जुनचा २०१४ मध्ये आलेला चित्रपट 'रेस गुर्रम' ब्लॉकबस्टर ठरला होता. ३५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १०१ कोटीचा बझनेस केला होता.