दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानासाठी मिथुन यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
मिथुन चक्रवर्ती अभिनेते असण्यासह व्यवसायिक देखील आहेत. देशात मिथुन यांची काही हॉटेल्स असून येथून कोट्यावधी रुपये कमावतात.
मिथुन चक्रवर्तींचे myneta.info च्या वेबसाइटनुसार, बँका, आर्थिक संस्था आणि नॉन-बँकिंग आर्थिक कंपन्यांमध्ये त्यांच्यासह पत्नीच्या नावे 33 कोटी 30 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.
रिपोर्ट्सनुसार, मिथुन चक्रवर्तींचे नेटवर्थ 101 कोटी रुपये आहे. पण मिथुन यांच्यावर 2 कोटी रुपयांची देणेदारीही आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे मर्सिडीज ते टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड्सच्या ब्रँडच्या कार आहेत. या कारची किंमत 1 कोटींपेक्षा अधिक आहे.
मिथुन चक्रवर्तींनी सर्वाधिक गुंतवणूक संपत्तीत केली आहे. तमिळनाडूत मिथुन यांच्यासह पत्नीच्या नावावर चार एकर जमीन आहे. याची किंमत 9 कोटी 13 लाख रुपये आहे.
तमिळनाडूच मिथुन यांच्यासह पत्नीच्या नावावर एक कमर्शियल बिल्डिंग आहे. याच्या माध्यमातूनही ते तगडी कमाई करतात.
मिथुन यांची मुंबईत दोन आणि तमिळनाडूत एक घर आहे. या घरांची किंमत 5 कोटी 79 लाख रुपये आहे. एकूणच 38 कोटी 50 लाख रुपये संपत्तीत गुंतवणूक केली आहे.