प्राजक्ता माळीचे वजन किती, लोक म्हणाले वजन कमी करू नको
Entertainment Dec 10 2024
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
महाराष्ट्रभर प्राजक्ता माळीचा फॅनबेस
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीचा फॅन बेस हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तिने जुळून येति रेशीमगाठी या मालिकेतून स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे.
Image credits: Instagram
Marathi
प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच व्यावसायिक बनली
प्राजक्ता माळी ही एक अभिनेत्री असून ती व्यावसायिक बनली आहे. ती स्वतःचा एक दागिन्यांचा एक ब्रँड चालवत असून कोकणात तिचे रिसॉर्ट आहे.
Image credits: Instagram
Marathi
प्राजक्ता माळीने काय पोस्ट केली
कधी नव्हे ते गालावर बाळसे यायला लागलेत, आजूबाजूचे लोक म्हणायला लागलेत की एवढी बारीक नको होऊस आणि मला तर ५० किलो वजन करायचं आहे असं तिने म्हटलं आहे.
Image credits: Instagram
Marathi
प्राजक्ता माळीचे वजन किती आहे?
प्राजक्ता माळीचे आताचे वजन ५१ किलो असल्याचं तिच्या पोस्टवरून दिसून आले आहे. यावर नेटकऱ्यांनी स्वतःच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Image credits: Instagram
Marathi
प्रामाणिकपणे सांग, तू खूप सुंदर आहेस
“प्रामाणिकपणे, सांगू तू खूप सुंदर आहेस”, “प्राजू आम्हाला कशी पण आवडते”, “एवढंच राहू दे आता वजन… खूप कमी नको करूस” अशा कमेंट्स प्राजक्ताच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.
Image credits: Instagram
Marathi
प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटामुळे चर्चेत आली
प्राजक्ता माळी हि तिच्या फुलवंत चित्रपटामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.