Entertainment

भारती सिंहची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल, झालाय हा आजार

Image credits: instagram

भारती सिंह रुग्णालयात दाखल

कॉमेडियन भारती सिंह एका मोठ्या समस्येचा सामना करत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये भारतीने कोणत्या आजाराचा सामना करतेय याची माहिती दिलीय.

Image credits: instagram

भारतीने सांगितली सद्यस्थिती

भारतीने म्हटले की, गेल्या तीन दिवसांपासून आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्याने फार त्रास होतोय. भारतीने पती हर्ष लिंबाचियासोबत रुग्णालयात आल्याचे सांगितले.

Image credits: instagram

व्हिडीओमध्ये काय म्हटलेय?

व्हिडीओच्या सुरुवातीला भारती सिंहने म्हटले की, तिला फूड पॉइजनिंग झाले आहे. पण डॉक्टरांनी काही वैद्यकीय चाचण्या केल्या असता मला होत असलेला त्रास गंभीर असल्याचे सांगितले.

Image credits: instagram

पित्ताशयात खडे झालेत

भारती सिंहने पुढे म्हटले की, पित्ताशयात खडे झाले आहेत. यामुळे काहीही खाल्ले तरीही दुखते आणि उलटी होते. यामुळे पती हर्षही फार दु:खी झाला आहे.

Image credits: instagram

मुलाला करतेय मिस

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भारती आपला मुलगा गोला याला फार मिस करतेय. आरोग्यासंबंधित उद्भवणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष केले. खरंतर असे करायला नको होते. 

Image credits: instagram

चाहत्यांनाही भारतीने दिलाय खास मेसेज

भारतीने आपल्या चाहत्यांनाही म्हटले की, आरोग्यासंबंधित समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. जेणेकरुन तुम्हाला रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही.

Image credits: instagram

कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

भारती सिंहला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या भारतीला लिक्विड डाएट दिले जातेय. लवकरच भारतीची प्रकृती सुधारली जाईल अशी अपेक्षा केली जातेय.

Image credits: instagram