Entertainment

अंबानी परिवारात सोहळ्याला सुरुवात, क्रुज पार्टीचा पहिला फोटो आला समोर

Image credits: Instagram

परफेक्ट मॉर्निंग्स म्हणत ऑरीने शेअर केला फोटो

अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी आलिशान क्रुजवर ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच ऑरीने परफेक्ट मॉर्निंग्स म्हणत क्रुजमधून एक फोटो शेअर केला आहे. 

Image credits: Instagram@Orry

ओरीने शेअर केला क्रुज पार्टीचा फोटो

ओरीने आलिशान क्रुज पार्टीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फोटोमध्ये क्रुजमधून सूर्यास्तावेळचा नजारा टिपण्यात आला आहे.

Image credits: Instagram@Orry

क्रुजमधून निळ्याशार समुद्राचे सुंदर फोटो

ऑरीने इंस्टाग्रामवरील स्टोरीला क्रुजमधून इटलीच्या निळ्याशार समुद्राचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

Image credits: Orry Instagram

बॉलिवूड कलाकारही उपस्थितीत राहणार

अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या ग्रँड सोहळ्यासाठी आलिया भट्ट, रणबीर कपूर, सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थिती लावणार आहेत. 

Image credits: Facebook

क्रुज पार्टीसाठी आंतरराष्ट्रीय गायिका पाहुण्यांचे करणार मनोरंजन

अनंत-राधिकाच्या क्रुज पार्टीसंदर्भात अधिक अपडेट्स समोर आलेले नाहीत. पण रिपोर्ट्सनुसार, आंतरराष्ट्रीय गायिका शकीरा पार्टीत पाहुण्यांचे मनोरंजन करणार आहे.

Image credits: Instagram