पहाटे 4.45 वाजता गोविंदाला कशी लागली गोळी, समोर आले मोठे कारण
Entertainment Oct 01 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
गोविंदा यांच्या पायाला लागली गोळी
बॉलिवूडमधील अभिनेता गोविंदाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या पायाला गोळी लागल्याचे सांगितले जात आहे.
Image credits: Facebook
Marathi
नक्की काय घडले?
आपली रिवॉल्वर स्वच्छ करताना गोविंदाला गोळी लागल्याचे बोलले जात आहे. यामुळे अभिनेत्याला रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Image credits: Social Media
Marathi
घराबाहेर पडण्याआधी घडली दुर्घटना
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 4.45 वाजता गोविंदा घरातून बाहेर पडण्याची तयारी करत होते. यावेळीच गोविंदा यांच्या पायाला गोळी लागली.
Image credits: Facebook
Marathi
रुग्णालयात दाखल
गोविंदा यांना रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. खरंतर, गोविंदा कोलकाता येथे जाण्यासाठी तयार करत असताना हातातील बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने दुर्घटना घडली आहे.
Image credits: Facebook
Marathi
गोळी लागल्याने पोलिसांकडून अधिक तपास
गोविंदा यांना ICU मध्ये दाखल केले असून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. याशिवाय रुग्णालाने अद्याप गोविंदा यांच्याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही.
Image credits: Facebook
Marathi
हेल्थ अपडेट
गोविंदा यांना गोळी लागल्यानंतर तातडीने घराजवळील क्रिटिकेयर रुग्णालयात नेण्यात आले. गोविंदा यांच्या पायाला लागलेली गोळी काढली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.