Venezuela Earthquake : व्हेनेझुएलामध्ये 2 मोठे भूकंप, हजारो नागरिकांचा मृत्यू

Published : Jun 25, 2026, 09:08 AM IST
Venezuela Earthquake

सार

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलामध्ये दोन मोठे भूकंप झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या स्थितीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलामध्ये दोन मोठे भूकंप झाल्याची घटना घडली. या भूकंपाचे धक्के ऐवढे जोरात होते की, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजधानी काराकाससह काही परिसरातील इमारती पत्त्यासारख्या खाली कोसळल्या गेल्या. याशिवाय हजारो लोक घर आणि ऑफिसमधून बाहेर पडत रस्त्यावर आले.

युनाइटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हे (USGS) यांनी भूकंपाच्या दुर्घटनेत 10 हजारांहून अधिक मृतांचा आकडा असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.सध्या घटनास्थळी रेस्क्यू टीमच्या मदतीने नागरिकांना मदत केली जात आहे. 

भूकंपाची स्थिती

व्हेनेझुएलामध्ये पहिला भूकंप 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. याचे केंद्र व्हेनेझुएलामधील कॅरेबियन तटावरील मोरोना परिराच्या पश्चिमेकडील भाग होता. हा भूकंप 22 किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यानंतर दुसरा देखील जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला गेला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले.

 

 

भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीती

एका रिपोर्टनुसार, व्हेनेझुएलामध्ये एक 7.2 रिश्टर स्केल आणि दुसरा 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या ठिकाणी जवळजवळ 1700 किलोमीटर दूर असलेल्या काही शहरांमधील इमारती खाली करण्यात आल्या. बुधवारी रात्री कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज देशाला संबोधित करणार असल्याचे म्हटले आहे.

भूकंपाचे ठिकाण

युएसजीएसच्या सर्व्हेनुसार, पहिला भूकंप 7.1 रिश्टर स्केलचा होता. पण याची तीव्रता नंतर 7.2 रिश्टर स्केल मोजण्यात आली. याचे केंद्र कॅरेबियन तटावरील मोरोन परिसराच्या पश्चिमेला होते. जे काराकासपासून 168 किलोमीटर दूर पश्चिमेला आहे. याच्या एका मिनिटानंतर 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 10 किलोमीटर खोल आणि केंद्र मोरोनपासून 16 किलोमीटर दक्षिण-पश्चिमेला होते.

सर्वाधिक तीव्रतेचे भूकंप

व्हेनेझुएलामध्ये झालेला भूकंप हा सर्वाधिक तीव्रतेपैकी एक आहेत. राजधानी काराकसमध्ये इमारती हलण्यास सुरुवात झाली असता नागरिक घाबरुन घराबाहेर पडले. काही ठिकाणी इमारतीच्या भिंती कोसळल्या गेल्या. रस्त्यावर इमारतींमधील तुटलेले फर्निचर दिसत होते. खरंतर, व्हेनेझुएलामध्ये आधीच आर्थिक स्थिती ढासाळली गेली आहे. अशातच भूकंपामुळे पुन्हा स्थिती कशी सुधारली जाईल हे देशासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Iran US Deal : कराराचे पालन न केल्यास कारवाई अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा
Cooking Gas: अमेरिकेत लोक गॅस सिलेंडर वापरतच नाहीत! मग ते स्वयंपाक करतात कसा?