Donald Trump: ट्रम्प आता आणखी पॉवरफुल, इराणविरोधात सिनेटचाही पाठिंबा

Published : Mar 05, 2026, 08:07 AM IST
US Senate Backs Trump on Iran Giving President More Military Power

सार

US Senate Backs Trump on Iran Giving President More Military Power: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरोधातील लष्करी कारवाईसाठी सिनेटचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.

वॉशिंग्टन: इराणविरोधात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या लष्करी कारवाईला आता अमेरिकन सिनेटचाही (वरिष्ठ सभागृह) पाठिंबा मिळाला आहे. इराणमधील हवाई हल्ले रोखण्यासाठी आणि कोणत्याही युद्धापूर्वी काँग्रेसची (अमेरिकेची संसद) परवानगी बंधनकारक करण्यासाठी एक प्रस्ताव आणला होता. पण सिनेटने तो प्रस्ताव मतदानाने फेटाळून लावला. यामुळे आता काँग्रेसच्या परवानगीशिवाय इराणवर कारवाई सुरू ठेवण्यासाठी ट्रम्प यांना मोठं राजकीय बळ मिळालं आहे.

100 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये हा प्रस्ताव 47 विरुद्ध 52 मतांनी फेटाळण्यात आला. सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे पक्षाच्या बहुतेक सदस्यांनी ट्रम्प यांच्या युद्ध धोरणालाच पाठिंबा दिला. राष्ट्राध्यक्षांच्या लष्करी अधिकारांवर नियंत्रण ठेवण्याचा डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रयत्न यामुळे फसला आहे.

या भागातील शांततेसाठी इराण एक धोका आहे आणि लष्करी कारवाई गरजेची आहे, असा ट्रम्प यांचा युक्तिवाद सिनेटने मान्य केला. लष्करी कारवाई सुरू होऊन पाच दिवस झाल्यानंतर मिळालेला हा पाठिंबा ट्रम्प प्रशासनासाठी खूप मोठा दिलासा आहे. देशात शस्त्रास्त्र आणि लष्करी तयारीवर चर्चा सुरू असली तरी, आता सिनेटच्या पाठिंब्यानंतर हल्ले आणखी तीव्र करण्याचा व्हाईट हाऊसचा विचार आहे.

दरम्यान, इराणविरोधातील लष्करी कारवाई खूप यशस्वी ठरत असून, अमेरिकन सैन्याने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. 'युद्ध आघाडीवर सर्वकाही खूप चांगलं चाललं आहे,' असं ते म्हणाले. 'या कामगिरीला 10 पैकी किती गुण द्याल?' असं विचारल्यावर, 'मी 15 गुण देईन,' असं म्हणत ट्रम्प यांनी आत्मविश्वास दाखवला.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

BMW Gift: थंडीत कुडकुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉसने दिली चक्क BMW कार!
Bone Marrow Cake: महिलेने बाळासाठी बनवला कलिंगड आणि बोन मॅरोचा केक!