US Iran Deal : डील झाली नाही, तर इराणवर भीषण हल्ला करू, ट्रम्प यांचा थेट इशारा

Published : Mar 31, 2026, 08:54 AM IST
Trump Threatens to destroy Iran Power Plants

सार

Trump Threatens to destroy Iran Power Plants : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. सध्या सुरू असलेली बोलणी फिस्कटल्यास आणि लवकर करार न केल्यास इराणवर भीषण हल्ला केला जाईल, असं त्यांनी म्हटलंय. 

Trump Threatens to destroy Iran Power Plants : सध्या सुरू असलेल्या चर्चेमुळे अमेरिकेने इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवरील हल्ले तात्पुरते थांबवले आहेत. पण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवा आणि गंभीर इशारा दिला आहे. 'जर आमच्यासोबतची चर्चा फिस्कटली आणि लवकरच करारावर शिक्कामोर्तब झालं नाही, तर इराणवर भीषण हल्ला केला जाईल. यावेळी आमचं लक्ष्य इराणची वीज केंद्रं, तेल विहिरी आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प असतील,' असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

ट्रम्प यांनी 'ट्रुथ' या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, 'इराणसोबतच्या चर्चेत बरीच प्रगती झाली आहे. पण जर लवकरच करार झाला नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी तात्काळ खुली केली नाही, तर आम्ही आतापर्यंत हातही न लावलेली सर्व वीज केंद्रं, तेल विहिरी आणि खार्ग बेट पूर्णपणे उद्ध्वस्त करू. यासोबतच इराणमधील आमचा 'सुंदर मुक्काम' संपवू. इराणच्या ४७ वर्षांच्या क्रूर राजवटीत मारल्या गेलेल्या आमच्या सैनिकांचा आणि इतरांचा हा बदला असेल.'

खार्ग बेट ताब्यात घेण्याचे संकेत:

याआधी एका मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, 'मध्य-पूर्व भागासाठी आमचे २५०० नौसैनिक आधीच रवाना झाले आहेत. तितकीच मोठी दुसरी तुकडीही तिथे जात आहे. आम्ही खार्ग बेट ताब्यात घेऊही शकतो किंवा नाहीही. सगळे पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. जर आम्ही तिथे हल्ला केला, तर आम्हाला तिथे आणखी काही काळ थांबावं लागू शकतं.' इतकंच नाही, तर 'ते आमचा हल्ला कसा रोखतील, माहीत नाही. कारण त्यांच्याकडे आता कोणतीही संरक्षण यंत्रणा उरलेली नाही. आम्ही हे बेट सहज जिंकू शकतो,' असंही ते म्हणाले.

तेल टँकर्सच्या वाहतुकीला परवानगी

याचदरम्यान, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकर्सच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. 'त्यांनी आम्हाला पाकिस्तानचा झेंडा असलेले १० टँकर भेट दिले होते. आता आणखी २० भेट दिले आहेत. ते सर्व होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात आहेत,' असं ट्रम्प म्हणाले.

दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. 'आमच्यावर जमिनी हल्ला झाल्यास, आम्ही अमेरिकेच्या हल्ल्याला तोंड देण्यासोबतच आखाती देशांवरही जमिनी हल्ला करू,' असं इराणने म्हटलं आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

BMW Gift: थंडीत कुडकुडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉसने दिली चक्क BMW कार!
Bone Marrow Cake: महिलेने बाळासाठी बनवला कलिंगड आणि बोन मॅरोचा केक!