US-China Relations : तणावाच्या वातावरणात ट्रम्प-शी जिनपिंग यांची भेट, जगाचं लक्ष बीजिंगकडे

Published : May 14, 2026, 09:33 AM IST
US-China Relations : तणावाच्या वातावरणात ट्रम्प-शी जिनपिंग यांची भेट, जगाचं लक्ष बीजिंगकडे

सार

US-China Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये एक महत्त्वाची बैठक होत आहे. दोन्ही देशांमधील व्यापार, तंत्रज्ञान आणि सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे.

US-China Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना बीजिंगमध्ये भेटले. दोन्ही देशांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान आणि सुरक्षेवरून तणाव सुरू असताना ही 'हाय-स्टेक्स' म्हणजेच अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होत आहे.

बीजिंगच्या 'ग्रेट हॉल ऑफ द पीपल'मध्ये शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांचं औपचारिक स्वागत केलं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांची, ज्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचा समावेश होता, शी जिनपिंग यांच्याशी ओळख करून दिली. चीनच्या 'पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ऑनर गार्ड बटालियन'ने ट्रम्प यांना मानवंदनाही दिली.

द्विपक्षीय चर्चेत काय?

या औपचारिक स्वागतानंतर, दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यामध्ये वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील आर्थिक सहकार्य, टॅरिफ (आयात कर), जागतिक पुरवठा साखळी आणि भू-राजकीय घडामोडी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. संध्याकाळी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ एका शाही भोजनाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

भेटीपूर्वीच चीनने आखल्या 'लक्ष्मणरेषा'

ट्रम्प आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्याचा भाग म्हणून बुधवारी चीनमध्ये दाखल झाले. चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांनी त्यांचं स्वागत केलं, यावेळी चीनमधील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड परड्यू हेही उपस्थित होते. २०१७ नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बुसान येथे झालेल्या भेटीनंतर दोन्ही राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहेत.

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वीच चीनने आपला कडक पवित्रा स्पष्ट केला होता. अमेरिकेतील चिनी दूतावासाने बुधवारी चीन-अमेरिका संबंधांमधील काही संवेदनशील मुद्द्यांवर आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. चीनने म्हटलं आहे की, १३ ते १५ मे दरम्यान होणाऱ्या ट्रम्प यांच्या दौऱ्यात 'चार रेड लाइन्स' म्हणजेच चार लक्ष्मणरेषा ओलांडल्या जाऊ नयेत. दूतावासाने 'X' वर एक पोस्ट करून म्हटलं, 'चीन-अमेरिका संबंधांमधील चार रेड लाइन्सना आव्हान देता कामा नये.' या पोस्टसोबतच्या फोटोमध्ये 'तैवानचा प्रश्न', 'लोकशाही आणि मानवाधिकार', 'राजकीय प्रणाली' आणि 'चीनचा विकासाचा हक्क' या चार मुद्द्यांचा उल्लेख आहे. (ANI)

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

SpaceX Starlink: स्टारलिंकच्या एन्ट्रीमुळे टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले, बर्नस्टीनने घटवले टार्गेट
Yellow Diamond: अमेरिकेतील पार्कमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करताना सापडला ६.०३ कॅरेटचा दुर्मिळ हिरा