World Best Cities : जगातलं नंबर 1 शहर कोणतं माहितीये? पाहा टॉप 7 बेस्ट सिटीजची लिस्ट

Published : Oct 17, 2026, 03:30 PM IST

जगातलं नंबर १ शहर कोणतं आहे, हे तुम्हाला माहितीये का? प्रसिद्ध 'अफार मीडिया'ने नुकतीच जगातील सर्वोत्तम ७ शहरांची यादी जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये कोणकोणत्या शहरांनी बाजी मारलीये?

PREV
17
1. लंडन

इंग्लंडची राजधानी लंडनने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या शहरात जुन्या ऐतिहासिक वास्तूंसोबतच आधुनिक कॅफे, बार, दुकाने आणि हॉटेल्स पाहायला मिळतात. जुनी परंपरा आणि मॉडर्न लाईफस्टाईल यांचा उत्तम मेळ इथे साधला गेलाय. त्यामुळे जगभरातले पर्यटक लंडनला पहिली पसंती देतात.

27
2. पॅरिस

जगातली 'रोमँटिक राजधानी' म्हणून ओळखलं जाणारं पॅरिस शहर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. फक्त २०२३ या एकाच वर्षात तब्बल ४४ दशलक्ष (४.४ कोटी) पर्यटकांनी या शहराला भेट दिली. इथलं सुंदर वातावरण कोणत्याही पर्यटकाला भुरळ घालतं.

37
3. न्यूयॉर्क

अमेरिकेतलं न्यूयॉर्क शहर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि एम्पायर स्टेट बिल्डिंगसारखी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे याच शहरात आहेत. जगभरातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे हे शहर नेहमीच गजबजलेलं असतं.

47
4. टोकियो

जपानच्या टोकियो शहराने जगातल्या सर्वोत्तम शहरांच्या यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे. 'अफार मीडिया'च्या रिपोर्टनुसार, २०३० सालापर्यंत ६० दशलक्ष (६ कोटी) पर्यटकांना आकर्षित करण्याचं टोकियोचं टार्गेट आहे. यातून १३६ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळवण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलंय.

57
5. सिंगापूर

'द लिटल रेड डॉट' या नावाने ओळखलं जाणारं सिंगापूर हे अतिशय सुंदर शहर आहे. या यादीत सिंगापूरने पाचवे स्थान मिळवले आहे. मरिना बे सँड्स आणि मरिना बे ही इथली प्रमुख आकर्षणे आहेत, जी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर खेचून आणतात.

67
6. दुबई

संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबई शहर या यादीत सहाव्या स्थानावर आहे. जगातली सर्वात उंच इमारत 'बुर्ज खलिफा' याच शहरात आहे. दुबई शहर तिथल्या अफाट संपत्तीसाठी आणि अतिशय आलिशान जीवनशैलीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

77
7. सॅन फ्रान्सिस्को

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराने जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत सातवे स्थान मिळवले आहे. गोल्डन गेट ब्रिज, ओरॅकल पार्क आणि अल्काट्राझ बेट ही या शहरातील काही अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. इथली ठिकाणे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories