तालिबानचा महिलांवरील निर्बंध: खिडक्या बंद करण्याचे आदेश

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने महिलांवर नवीन निर्बंध लादले आहेत. एनजीओमध्ये महिलांना काम देऊ नये आणि महिला दिसतील अशा ठिकाणी खिडक्या बांधू नयेत असे आदेश दिले आहेत.

काबुल: अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने महिलाविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. महिलांना एनजीओमध्ये काम देऊ नये. काम दिल्यास अशा संस्था बंद करण्याचा इशारा दिला आहे. देशात महिला इस्लामिक शिरस्त्राण योग्य प्रकारे परिधान करत नसल्याने त्यांना कामावरून काढून टाकावे असे आदेश तालिबान सरकारने २ वर्षांपूर्वीच दिले होते. आता पुन्हा असाच इशारा देत, महिलांना एनजीओमध्ये काम देऊ नये. काम दिल्यास अशा राष्ट्रीय आणि विदेशी स्वयंसेवी संस्था बंद करण्यात येतील असे म्हटले आहे. तालिबानने आधीच अफगाणिस्तानात अनेक नोकऱ्या आणि बहुतेक सार्वजनिक ठिकाणी महिलांवर बंदी घातली आहे. तसेच सहावी नंतर शिक्षणापासूनही वंचित ठेवले आहे.

महिला दिसतील अशा ठिकाणी खिडक्यांवर तालिबानची बंदी

काबुल: अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या तालिबानने आता महिला जास्त दिसणाऱ्या ठिकाणी असलेल्या घरांच्या/इमारतींच्या खिडक्या बांधू नयेत असा आदेश काढला आहे.

तसेच, आधीपासूनच असलेल्या अशा खिडक्या बंद करण्याचेही निर्देश दिले आहेत. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने हे विधान केले असून, महिला काम करताना पुरुषांना दिसल्याने समस्या निर्माण होतात. महिला जास्त असलेल्या अंगण, स्वयंपाकघर, विहीर अशा ठिकाणी दिसतील अशा नवीन इमारतींमध्ये खिडक्या बांधू नयेत. नगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असे आदेश दिले आहेत.

तसेच, आधीपासूनच असलेल्या घरांना आड भिंत बांधावी किंवा अशा खिडक्या कायमस्वरूपी बंद कराव्यात असेही सांगण्यात आले आहे.

Share this article