'पती पत्नीला मारहाण करु शकतो, पण तिला जखम होऊ नये, तिची हाडे मोडू नयेत!'

Published : Feb 19, 2026, 08:28 AM IST
Taliban Legalizes Domestic Violence Husbands Can Beat Wives

सार

Taliban Legalizes Domestic Violence Husbands Can Beat Wives : अफगाणिस्तानमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचार तालिबानने कायदेशीर केला आहे. 

Taliban Legalizes Domestic Violence Husbands Can Beat Wives : तालिबानने महिलांविरोधातील घरगुती हिंसाचार कायदेशीर केला आहे. पतींना त्यांच्या पत्नी आणि मुलांना हाडे न मोडता किंवा उघड्या जखमा न करता शारीरिक शिक्षा करण्याची परवानगी देणारा कायदा लागू करण्यात आला आहे. इस्लामिक गटाचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी स्वाक्षरी केलेल्या दंड संहितेत (Penal Code) हे नमूद केले आहे. याच कायद्यानुसार गुलामगिरीलाही कायदेशीर ठरवण्यात आले आहे. मारहाणीत पत्नीला फ्रॅक्चर किंवा जखम झाल्यास केवळ १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. न्यायालयात महिलेने यशस्वीपणे छळ सिद्ध केल्यावरच पुरुषाला दोषी ठरवले जाईल. महिलेने आपल्या जखमा न्यायाधीशांना दाखवाव्या लागतील आणि तिचे शरीर पूर्णपणे झाकलेले असावे. तसेच, पती किंवा पुरुष पालकाने तिच्यासोबत न्यायालयात जाणे आवश्यक आहे, असेही म्हटले आहे.

त्याच वेळी, विवाहित महिलेने पतीच्या परवानगीशिवाय नातेवाईकांना भेट दिल्यास तिला तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. कलम ९ नुसार अफगाण समाजाची चार वर्गांमध्ये विभागणी केली आहे: धर्मगुरू (उलेमा), उच्चभ्रू (अशरफ), मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय. या व्यवस्थेत, एकाच गुन्ह्यासाठी शिक्षा आता गुन्ह्याचे स्वरूप किंवा तीव्रतेवर अवलंबून राहणार नाही, तर आरोपीच्या सामाजिक स्थितीवर आधारित असेल, असे म्हटले आहे.

९० पानांच्या नवीन दंड संहितेने (Penal Code) पूर्वीच्या अमेरिकन-समर्थित प्रशासनाने आणलेला २००९ चा महिलांवरील हिंसाचार निर्मूलन (EVAW) कायदा रद्द केला आहे. 'द इंडिपेंडंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानने नवीन संहितेवर चर्चा करणे हा गुन्हा ठरवल्यामुळे लोक त्याविरोधात बोलण्यास घाबरत आहेत, असे हक्क संघटनांचे म्हणणे आहे. अफगाण मानवाधिकार संघटना 'रवादारी'ने एका निवेदनात संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना या फौजदारी प्रक्रिया संहितेची अंमलबजावणी तात्काळ थांबवावी आणि ती रोखण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करावा, अशी मागणी केली आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Turkey Kitten Rescue: मांजराच्या पिल्लाला वाचवताना तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
Brazil Train Accident: ब्राझीलमध्ये रेल्वे रुळावर पडलेल्या क्रेनला ट्रेनची धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ