फुटबॉल स्पर्धेचा गुगलचा खास डूडल, ॲनिमेटेड डूडलसह गुगलचा ऑलिम्पिक इव्हेंट साजरा

Published : Jul 28, 2024, 12:20 PM ISTUpdated : Jul 28, 2024, 04:49 PM IST
google doodle Football olympics

सार

Football Olympics : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरूवात झाली असून 26 जुलैपासून गुगल एक खास डुडलद्वारे ऑलिम्पिक साजरा करत आहे. रविवारचे खास डूडल पॅरिस ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेचे आहे.

Football Olympics : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला (Paris Olympics 2024) 26 जुलैपासून सुरूवात झाली आहे. 26 जुलैपासून गुगल (Google)एक खास डुडलद्वारे ऑलिम्पिक साजरा करत आहे. रविवारचे खास डूडल पॅरिस ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेचे आहे. गुगल डूडलच्या माध्यमातून फुटबॉल स्पर्धा साजरी करत आहे. हा कार्यक्रम 11 ऑगस्टपर्यंत चालणार असून भारत देखील या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

ॲनिमेटेड डूडलसह Google ने हा इव्हेंट केला साजरा

Google ने हा इव्हेंट ॲनिमेटेड डूडलसह साजरा केला असून गुगल सर्च इंजिन एका ॲनिमेटेड डूडलसह आजचा फूटबॉल ऑलिम्पिक साजरा करत आहे. या डूडलमध्ये कंपनीने कोंबडीचे बाळ दाखवले असून हे पिल्लू फुटबॉलप्रमाणे एवोकॅडो फेकताना दाखवले आहे. तर एक पिल्लू तो बॉल अडवण्यासाठी थांबले आहे. या गुगल डूडलवर क्लिक केल्यास ऑलिम्पिक गेम्स पॅरिस 2024 फुटबॉलची (Paris Olympics 2024) सर्व माहिती तुम्हाला मिळेल. गुगल आपल्या वापरकर्त्यांना स्पर्धेच्या शेड्यूलसह ​​निकालांची माहिती देखील देत आहे. याचबरोबर गुगल यूजर्स या डूडलवर क्लिक करून मेडल, स्टँडिंग आणि नॉकआउट्सची माहितीही मिळवू शकतात. गुगलने या डूडलचे खास वर्णन दिले आहे, ‘हॅटट्रिक, हार्टब्रेक आणि मातृभूमीचा नायक’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) 200 हून अधिक देशांतील खेळाडूंचा सहभाग

पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) साठी 200 हून अधिक देशांतील खेळाडू, 32 क्रीडा शाखांमधील 329 स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी फ्रान्सच्या राजधानीत एकत्र आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) खेळ 26 जुलै रोजी सुरू झाले असून 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत.

भारताचे 117 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) सहभागी

या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेत 70 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) 117 खेळाडूंचा ताफा पॅरिसला पाठवला आहे. यापैकी 70 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. यामध्ये 47 भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये एक किंवा अधिक वेळा भाग घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024)  नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लोव्हलिना आणि पीव्ही सिंधू यांच्याकडून पुन्हा एकदा पदकांची अपेक्षा आहे.

आणखी वाचा :

Paris Olympic 2024:हॉकीत भारताने न्यूझीलंडला हरवले, हरमनप्रीत विजयाची हिरो

Paris Olympics 2024 : मनू भाकरचा अंतिम फेरीत प्रवेश, भारताला पदकाची आशा

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Sydney Attack : ज्यू समुदायावर गोळीबार करणारा नवीद अकरम नक्की कोण? ड्रायव्हिंग लायसन्सने उघड झाली ओळख!
सिडनीतील बॉन्डी बीचवर 2 हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबारात 10 ठार, बघा हृदयाचा थरकाप उडवणारे VIDEOS