
साऊथ कोरियन आर्मी सध्या मोठ्या वादात सापडली आहे. गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी स्पेशल वॉरफेअर कमांडच्या एलिट जवानांना कॅटवॉक आणि फॅशन-मॉडेल पोश्चरचे धडे दिले गेल्याचा व्हिडिओ समोर आला, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
टीव्ही चोसून (TV Chosun) ने हा व्हिडिओ लीक केला आणि नंतर एका यूट्यूबर आणि माजी स्पेशल फोर्स नॉन-कमिशनड ऑफिसरने (NCO) तो शेअर केला. या व्हिडिओमध्ये, कॅमोफ्लाज कपडे आणि हाय हिल्स घातलेल्या प्रोफेशनल मॉडेल्स, १ल्या स्पेशल फोर्स ब्रिगेडच्या पुरुष कमांडोंना रॅम्पवर कसं चालायचं, वळायचं आणि पोझ कशी द्यायची, हे शिकवताना दिसत आहेत.
हा प्रकार १ल्या स्पेशल फोर्स ब्रिगेडच्या बेसवर 'के-वॉकिंग परफॉर्मन्स मिलिटरी फेस्टिव्हल' (K-Walking Performance Military Festival) दरम्यान घडला. हा फेस्टिव्हल वर्षातून दोनदा होणाऱ्या पर्सनल डेव्हलपमेंट प्रोग्रामचा एक भाग म्हणून आयोजित केला होता.
साऊथ कोरियन आर्मीची स्पेशल फोर्स त्यांच्या कडक फिजिकल ट्रेनिंग आणि कॉम्बॅट रेडीनेससाठी (युद्ध सज्जतेसाठी) ओळखली जाते. त्यामुळे त्यांना कॅटवॉक ट्रेनिंग देण्याचा हा प्रकार खूपच वादग्रस्त ठरला आहे.
रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे सेशन वर्षातून दोनदा होणाऱ्या 'कॅरेक्टर आणि पर्सनल डेव्हलपमेंट' कल्चरल प्रोग्रामचा भाग होतं. लष्कराच्या प्रतिनिधींनी पुढे सांगितलं की, बाहेरून प्रोफेशनल फॅशन मॉडेल्स बोलावण्याचा मुख्य उद्देश जवानांची पोश्चर आणि चालण्याची पद्धत सुधारणे हा होता, जेणेकरून बेसिक मिलिटरी बेअरिंग तयार होईल.
इंटरनॅशनल वॉकिंग असोसिएशनने स्पष्टीकरण दिलं की, या प्रोग्रामचा ९०% पेक्षा जास्त भाग फॅशन-मॉडेल रॅम्प ट्रेनिंगवर नसून योग्य पोश्चर आणि निरोगी चालण्याच्या पद्धतीवर केंद्रित होता. कॅटवॉक परफॉर्मन्स फक्त १५ मिनिटांचा एक सरप्राईज इव्हेंट होता.
पण, पीपल पॉवर पार्टीचे खासदार पार्क चूंग-क्वोन (Park Choong-kwon) यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर, राजकीय वर्तुळात आणि लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. माजी स्पेशल फोर्स NCO ने डिफेन्स लीडरशिपवर कडक टीका केली आणि म्हटलं की या चुकीसाठी फ्रंट लाईनवर लढणाऱ्या जवानांना दोष देता कामा नये.
हा व्हिडिओ अनेक स्थानिक मीडिया आउटलेट्सने उचलून धरला आणि तो अशा वेळी व्हायरल झाला आहे जेव्हा उत्तर कोरिया लँडमाईन आणि मिसाईल टेस्टच्या माध्यमातून प्रादेशिक सुरक्षेचा तणाव वाढवत आहे.
पीपल पॉवर पार्टीचे खासदार पार्क चूंग-क्वोन यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवरून साऊथ कोरियन लष्करी नेतृत्वावर जाहीर टीका केली. फ्रंट-लाईन कमांडोंची अशी सार्वजनिक बदनामी केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
"उत्तर कोरिया लँडमाईन पेरत आहे आणि बॅलिस्टिक मिसाईल्स, क्रूझ मिसाईल्स आणि मल्टिपल रॉकेट लाँचर्सच्या टेस्ट करत आहे. आणि दुसरीकडे ली जे म्युंग (Lee Jae Myung) प्रशासनाच्या अंतर्गत असलेलं राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय, स्पेशल फोर्सच्या जवानांना चालायला शिकवण्यासाठी फॅशन मॉडेल्स आणत आहे," असं चूंग-क्वोन यांनी फेसबुकवर लिहिलं.
"या एलिट जवानांना जो अपमान सहन करावा लागला असेल, त्याची जबाबदारी लष्कराने घेतली पाहिजे. तरीही युनिटने कारणं दिली की हे ट्रेनिंग जवानांची पोश्चर आणि चालण्याची पद्धत सुधारण्यासाठी होतं," असंही ते पुढे म्हणाले.
👀A scandal has emerged in the South Korean army: soldiers from an elite special forces unit were trained to walk like they were on a catwalk.
Female models in camouflage and heels demonstrated the soldiers' "correct poses" and "model walk," according to The Korea Herald.
The "training" took place in a military base gym. After the footage surfaced online, the army command was criticized. They attempted to justify the performance, claiming it was part of a "cultural program" designed to help improve the soldiers' posture.
— ZeRaM.ink base.eth (@i_zeram) November 5, 2026
खासदार आणि जनतेकडून झालेल्या टीकेनंतर, साऊथ कोरियन आर्मीने एक अधिकृत निवेदन जारी केलं. त्यांनी मान्य केलं की कॅटवॉक ट्रेनिंग 'अयोग्य' होतं, कारण ते एलिट स्पेशल वॉरफेअर युनिटच्या ऑपरेशनल स्वरूपाशी आणि कॉम्बॅट मिशनशी सुसंगत नव्हतं.
अधिकाऱ्यांनी हेही मान्य केलं की योग्य प्रशासकीय प्री-स्क्रीनिंग न करताच हे सेशन आयोजित करण्यात आलं होतं.