Video: आईने जेवणाच्या डब्यात मुलासाठी ठेवली लव्ह नोट, ज्याने मुलाच्या लव्हस्टोरीत आला ट्विस्ट ऐकून हसू आवरणार नाही...

Published : May 16, 2024, 05:46 PM ISTUpdated : May 16, 2024, 06:26 PM IST
Lunch box sweet note from mother

सार

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असाच एक हसून हसून पोट दुखावणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका छोट्या मुलाचं आणि त्याच्या आईची संभाषण दाखवलं आहे.

 

Love story and Lunch box note: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असाच एक हसून हसून पोट दुखावणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका छोट्या मुलाचं आणि त्याच्या आईची संभाषण दाखवलं आहे. आईने प्रेमाने दुपारच्या जेवणाचा डब्बा मुलाला शाळेत जाताना दिला आणि त्यात एक सुंदर संदेश देखील दिला होता. मात्र यावरून आता त्या मुलाच्या लव्ह स्टोरीमध्ये ट्विस्ट आला आहे. वाचा सविस्तर

वास्तविक, एका मुलाला त्याच्या आईने शाळेसाठी जेवणाचा डबा दिला होता. पण तो मुलगा खूप दुःखी होऊन आला आणि त्याने जेवणाचा डबाही खाल्ला नाही. जेवणाचा डबा पाहिल्यानंतर त्याची आई त्याला विचारते की त्याने जेवण का घेतले नाही . तर मुलाचे निरागस होऊन उत्तर दिले आहे आणि ते सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.

व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला विचारत आहे की त्याने दुपारचे जेवण का केले नाही. दु:खी दिसणारा मुलगा स्पष्ट करतो की, कारण त्याच्या आईने त्याच्या जेवणाच्या डब्यात एक चिठ्ठी ठेवली होती ज्यामध्ये लिहिले होते: "बाळा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे". त्याने सांगितले की त्याची मैत्रीण त्याच्या जवळ बसली होती.तिने ती चिठ्ठी पहिली आणि माझ्यावर रागावली आहे. त्यामुळे मी जेवण केले नाही.मुलाच्या उत्तराने आईने परत प्रश्न करून विचारले, तू डब्बा यासाठी खाल्ला नाही कारण तुझ्या मैत्रिणीने ती चिठ्ठी वाचली होती. यावर मुलाने होकार दिला आणि मी खूप तणावाखाली असल्याचे सांगतिले. हा व्हिडीओ शेअर करताना आईने कॅप्शनमध्ये लिहिले की, "जेव्हा मी जेवण का केले नाही असे विचारले, तेव्हा माझ्या मुलाने मजेशीर उत्तर दिले."

आणखी वाचा :

जगातील सर्वाधिक करोडपतींच्या यादीत न्यूयॉर्क अव्वल ! या भारतीय शहराचाही यादीत समावेश

गेल्या वर्षी मिस यूएसए बनलेल्या नोएलिया वोइगटने अचानक पद सोडले?

PREV

Recommended Stories

पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे मदतीची याचना, पती भारतात करतोय दुसरे लग्न!
बांगलादेशी नागरिकाने भारतीय विद्यार्थिनींची काढली छेड, लोकांमध्ये संताप (WATCH)