पंतप्रधान मोदींचा पोलंड-युक्रेन दौरा: काय आहे महत्त्व?

Published : Aug 21, 2024, 12:25 PM IST
Narendra Modi speech on Wayanad landside

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर पोलंड आणि युक्रेनला भेट देणार आहेत. हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे कारण ४० वर्षांनी भारताचा पंतप्रधान पोलंडला भेट देणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. ते पोलंड आणि युक्रेनला भेट देणार आहेत. ते 21 आणि 22 तारखेला दोन दिवस पोलंडमध्ये राहतील आणि द्विपक्षीय चर्चा करतील. तर 23 ऑगस्टला ते युक्रेनच्या दौऱ्यावर असतील. पंतप्रधान मोदी आज सकाळी त्यांच्या खासगी विमानाने पोलंडला रवाना झाले आहेत. पोलंडमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनिवासी भारतीयांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारीच पंतप्रधान मोदींच्या आगामी परदेश दौऱ्याची घोषणा केली होती.

भारतीय पंतप्रधान ४० वर्षांनंतर पोलंडला भेट देणार आहेत

तब्बल 40 वर्षांनंतर भारताचा एक पंतप्रधान पोलंडला गेला आहे. दोन्ही देशांमध्ये मजबूत आर्थिक संबंध आहेत. पीएम मोदी परस्पर संबंध आणि व्यापार वाढवण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पोलंडच्या राजदूतांनी भारतीय पंतप्रधानांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. परदेशातही पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

30 वर्षांनंतर युक्रेनला भेट दिली

भारतीय पंतप्रधान 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच युक्रेनला भेट देत आहेत. रशियामध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर कोणत्याही देशाचा पंतप्रधान युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना खास निमंत्रण दिले होते, जे त्यांनी स्वीकारले आणि लवकरच येण्याचे आश्वासन दिले. पीएम मोदींचा युक्रेन दौरा रशियासोबतचे युद्ध संपवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकतो.
आणखी वाचा - 
बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Live TV Broadcast: लाईव्ह रिपोर्टिंग करताना पत्रकाराला समुद्राच्या लाटेने उडवलं, पाहा थरारक व्हिडिओ
Mountaineer Period Hack: १६,००० फुटांवर मासिक पाळी आली, गिर्यारोहक तरुणीने टिश्यू पेपरचा बनवला पॅड