Color Blind Island : प्रशांत महासागरातील पिंगलॅप अटोल नावाच्या बेटावर राहणाऱ्या लोकांना रंग ओळखता येत नाहीत. एका भयंकर वादळामुळे झालेल्या जनुकीय बदलामुळे इथल्या लोकांना संपूर्ण जग फक्त कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) दिसतं.
इथल्या लोकांसाठी जग म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा!
विचार करा, तुमचं आयुष्य जर ब्लॅक अँड व्हाईट सिनेमासारखं झालं तर? प्रशांत महासागरातील 'पिंगलॅप अटोल' नावाच्या या लहान बेटावरील लोकांना जग असंच दिसतं. मायक्रोनेशिया देशाच्या या बेटावर सुमारे २५०-३०० लोक राहतात.
25
अॅक्रोमॅटोप्सिया: रंगांना गिळणारा दुर्मिळ आजार
जगभरात ३०,००० माणसांमागे एकाला होणारा 'अॅक्रोमॅटोप्सिया' नावाचा आजार या बेटावर मात्र दर १० माणसांमागे एकाला आहे. यामुळे डोळ्यातील रंग ओळखणाऱ्या पेशी काम करत नाहीत आणि जग फक्त राखाडी छटांमध्ये दिसतं.
35
१७७५ च्या त्या भयंकर वादळाने नशीबच बदललं
१७७५ साली आलेल्या 'लेंकीकी' वादळात बेटावर फक्त २० लोक वाचले. त्यातील एका व्यक्तीमध्ये रंग आंधळेपणाचं जनुक होतं. पुढे तेच जनुक पिढ्यानपिढ्या पसरत गेलं, ज्याला 'जेनेटिक बॉटलनेक' म्हणतात.
या लोकांना सूर्यप्रकाशाचा खूप त्रास होतो, पण रात्रीच्या अंधारात त्यांची नजर सामान्य माणसापेक्षा जास्त तेज असते. त्यामुळे रात्री मासेमारी करणं किंवा इतर कामं करणं त्यांना सोपं जातं.
55
शास्त्रज्ञांसाठी बनली प्रयोगशाळा
हे बेट जनुकीय शास्त्रज्ञांसाठी एक जिवंत प्रयोगशाळा आहे. न्यूरोलॉजिस्ट ओलिव्हर सॅक्स यांनी 'द आयलँड ऑफ द कलरब्लाइंड' या पुस्तकातून या बेटाची कहाणी जगासमोर आणली.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.